बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा आवामी लीगचं सरकार येणार आहे आणि शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत. भारताच्या शेजारी देशात रविवारी (७ डिसेंबर) सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.
या निवडणुकीत आवामी लीगने ३०० पैकी दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना २००९ मध्ये पहिल्यांदा बांगलादेशच्या पतंप्रधान झाल्या होत्या. तेव्हापासून शेख हसीना याच बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. यापूर्वी १९९१ ते १९९६ अशी पाच वर्षे शेख हसीना बांगलादेशच्या पतप्रधान होत्या. बांगलादेशमधील ३०० पैकी २९९ जागांवर रविवारी निवडणूक पार पडली. यापैकी २१६ जागा आवामी लीगने जिंकल्याची माहिती मिळतेय.