कुडाळ : सिंधुदुर्गच्या भूमीत म्हणजेच सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिननं क्रीकेटचे धडे घेतले. मात्र त्याच सिंधुदुर्गवरचं प्रेम आजही कायम आहे, कारण सोमवारी त्याचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या सेलीब्रेशनसाठी सचिन आपल्या परिवारासह भोगवे इंथ एका अलिशान हॉटेलमध्ये दाखल झालाय.
क्रीकेटचा देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. अनेक विक्रम करून अवघ्या जगाचं लक्ष वेधणारा हा खेळाडु. त्यानं सुरवातीला क्रीकेटचे धडे घेतले ते सावंतवाडीच्या जिमखाना मैदानात. रमाकांत आचरेकर हे त्याचे गुरू. सचिनच सिंधुदुर्गच्या मातीशी असलेलं हेच नातं आजही कायम आहे.
आज सचिनचा वाढदिवस. परंतु हे सेलिब्रेशन मुंबईतल्या अलिशान हॉटेलात न करता तो दाखला झाला तो थेट भोगवे इंथ. सोमवारी इथल्या अलिशान हॉटेलमध्ये आपल्या कुटूंबियांसमवेत तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. रविवारी सायंकाळी त्यांनं किल्ले निवती परिसरात फेरफटका मारला. त्यावेळी तिथल्या स्थानिकांशी, मच्छिमारांशी संवादही साधला.
आणखी दोन तीन दिवस सचिन इथल्या निसर्गाचा, पर्यटनाचा आस्वाद घेणार आहे. आजही सिंधुदुर्गच्या या भूमीवर प्रेम करणारा आणि आपलं नातं जपणारा सचिन आपला वाढदिवस या भूमीत साजरा करतोय, ही बाब निश्चितच कोकणवासियांना अभिमानास्पद आहे.