राष्ट्र गौरव पुरस्कार अँड. शिवाजी देसाई यांना प्रदान

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि अपराध नियंत्रण परिषदेतर्फे देण्यात आला पुरस्कार
Edited by: संदीप देसाई
Published on: January 22, 2023 18:21 PM
views 228  views

दोडामार्ग : आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आणि अपराध नियंत्रण परिषद आणि नॅशनल अँटी करप्शन कमिशन यांचा सर्वोच्च राष्ट्र गौरव सन्मान मानव अधिकार संरक्षण आणि समाज सेवेत दिलेल्या उत्कृष्ट योगदाबद्दल सत्तरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, सुप्रसिद्ध वक्ते आणि वकील अँड शिवाजी देसाई यांना हडफडे गोवा येथील हॉटेल पार्क रेगिसच्या सभागृहात भरलेल्या अदभुत भारत संपन्न भारत या आंतरराष्ट्रिय मानव अधिकार आणि अपराध नियंत्रण परिषद व नेशनल अँटी करप्शन कमिशन यांच्या आंतरराष्ट्रिय अधिवेशनात आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात नॅशनल अँटी करप्शन कमिशनचे अध्यक्ष डॉ. हरीश मखिजा आणि या कमिशनचे प्रमुख संस्थापक डॉ. वी.पी. सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


सत्तरी तालुक्यातील अँड.  शिवाजी देसाई यांनी आजपर्यंत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये  आपल्या असंख्य विषयांवरील व्याख्यानातून मोठ्या प्रमाणात समाज आणि तरुणांमध्ये जागृतीचे कार्य केले आहे. ते शिवव्याख्याते आणि मोटिवेशनाल स्पीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. गोव्याच्या ग्रामीण भागात होणाऱ्या कायदा जनजागृती कार्यक्रमात ते सातत्याने अग्रेसर असतात. माहिती अधिकारातून समृद्धीकडे ही संकल्पना त्यांनी सत्तरी तालुक्यात राबवून माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी प्रकरणे उजेडात आणली. सत्तरी तालुक्यात मागील वर्षात आलेल्या पुराच्या वेळी  लोकास दिलासा देण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होते. 


गोव्यातील असंख्य सामाजिक चळवळी मध्ये त्यांनी आपला सक्रिय सहभाग दर्शविला आहे. सत्त्तरी इतिहास संवर्धन समितीच्या माध्यमातून इतिहास संवर्धनासाठी नाणुस किल्ला चळवळ त्यांनी उभी केली आणि क्रांतिवीर दीपाजी राणे  तसेच दादा राणे यांचा इतिहास सर्वांच्या समोर आणला. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषय घेऊन सातत्याने समाज जागृतीचे काम त्यांनी केले.कोविड काळात अनेक विषय हाताळून समाज जागृतीचे काम केले आणि सरकारला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडले. हल्लीच त्यांना ग्लोबल फाऊंडेशन पुणेचा डायनॅमिक पर्सनॅलिटी ऑफ द इअर हा पुरस्कार, गोवा सरकारचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, गरुड झेप अकादमी पुणे चा बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर ऑफ इंडिया अवॉर्ड, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर याच्या हस्ते काणकोण आमोणे येथील लोकोत्सवात विशेष सन्मान. अनेक सामाजिक संस्थांकडून सन्मान, असे अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झाले आहेत.


विशेष म्हणजे अँड शिवाजी देसाई यांची आई ही महाराष्ट्रातील सावंतवाडी तालुक्यातील खळणेवाडी ह्या गावची असून. अँड शिवाजी देसाई यांचा जन्म सावंतवाडीत झाला आहे.आणि त्यामुळे गोव्याबरोबर महाराष्ट्रासाठी देखील हा पुरस्कार भूषणावह आहे.