BIG BREAKING ; राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा

मानहानी प्रकरणात ठोठावली शिक्षा
Edited by: ब्युरो
Published on: March 23, 2023 11:41 AM
views 273  views

नवी दिल्ली : मानहानी प्रकरणात खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, राहुल यांना जामीनही कोर्टाकडून मंजूरही करण्यात आला आहे. मानहानी प्रकरणी राहुल हे दोषी ठरले होते. सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवले होते. मोदी आडनावावरुन टीका करणं राहुल यांना भोवले आहे. 2019 मधील प्रकरणावरुन राहुल यांना कोर्टाने दोषी ठरवले होते.

मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने आज सकाळी दोषी ठरवले होते.  मोदी आडनावावरुन विनोद करणे राहुल यांना भोवले आहे. दरम्यान, राहुल गांधी हे ऑक्टोबर 2021 मध्ये भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात गांधी सूरत न्यायालयात अखेरचे हजर झाले होते.

गुजरातमधील सुरत येथील कोर्टाने आज राहुल गांधी यांना त्यांच्या कथित 'मोदी आडनाव' बद्दल केलेल्या 2019 च्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. त्यामुळे आता राहुल गांधी यांना काय शिक्षा होणार याची उत्सुकता होती. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सर्व चोरांना मोदी हे समान आडनाव कसे आले?, अशी टीका केली होती. याप्रकरणी  भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेला संबोधित करताना वायनाड लोकसभा खासदारांनी ही कथित टिप्पणी केली होती, अशी तक्रार केली होती.

मानहानी खटला प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवादाची सुनावणी पूर्ण केली आणि चार वर्षे जुन्या मानहानीच्या खटल्याचा निकाल देण्यासाठी 23 मार्चची तारीख निश्चित केली होती, असे गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितले.