नवी दिल्ली : लडाखच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा चीनबरोबरचा सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला. चीनने लडाखमधील भारताची हजारो किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आहे, दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांबरोबरच्या बैठकीत पूर्णपणे खोटी माहिती दिली असा आरोप राहुल यांनी केला. त्यावर, राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि निरर्थक असल्याचे उत्तर भाजपने दिले.