अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शनिवारीयावेळी पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांना माझी विनंती आहे की, भव्य रामाच्या उभारणीसाठी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवसापासून देशभरातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवावी. 14 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. तर 23 जानेवारीनंतर रामभक्तांनी अयोध्येत यावे साडेपाचशे वर्षे आपण वाट पाहिली तर अजून काही श्रीराम दर्शनासाठी प्रतीक्षा करा, असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी रामभक्तांना केले. तर अयोध्येला भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवायचे आहे. 14 जानेवारीपासून सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशाने आधुनिक रेल्वे बांधणीच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. वंदे भारत आणि नमो भारतनंतर आज देशाला आणखी एक आधुनिक ट्रेन मिळाली आहे. या नव्या ट्रेनला अमृत भारत ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत ट्रेनची ही त्रिमूर्ती भारतीय रेल्वेला नवसंजीवनी देणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.अयोध्या धाम विमानतळाचे नामकरण त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने केल्यास या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाना आशीर्वाद मिळतील असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे, जो आपल्याला भगवान श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतात, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम, आपल्याला दिव्य-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल. सध्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची 10-15 हजार लोकांना सेवा देण्याची क्षमता आहे. स्टेशनचा पूर्ण विकास झाल्यानंतर अयोध्याधाम रेल्वे स्थानकावर दररोज 60 हजार प्रवासी ये-जा करू शकणार असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेशमधील विविध विकासकामांचे लोकार्पण पार पडले. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेवेळी संपूर्ण देशवासीयांना घरोघरी रामज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, रामलल्ला प्रतिष्ठापनेचा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आला आहे. त्यामुळे यादिवशी संपूर्ण देशवासीयांनी 22 जानेवारीला घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर 22 जानेवारीला देशातील नागरिकांनी अयोध्ये येऊ नये, घरी राहूनच या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, जेणे करून अयोध्येत होणारी गर्दी टळेल आणि पोलीस प्रशासनावर भार पडणार नाही असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.