गुजरात : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलयांची आज जयंती आहे. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे आदरांजली वाहिली आणि वल्लभभाईंच्या आदर्शांचे स्मरण केले, यावेळी त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी मोरबी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला, बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. म्हणाले, 'मी इथे एकता नगरमध्ये आहे, पण माझे मन मोरबीतील पीडितांशी जोडले गेले आहे.' या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
'एकीकडे अभिमानाचा दिवस, तर दुसरीकडे करुणेने भरलेले अंतःकरण' : PM मोदी
पंतप्रधान म्हणाले की, मी आयुष्यात क्वचितच इतक्या तीव्र वेदना व्यक्त केल्या असतील. एकीकडे आझ अभिमानाने भरलेला दिवस आहे, दुसरीकडे कर्म आणि कर्तव्याचा मार्ग आहे. या कर्तव्याच्या वाटेची जबाबदारी घेऊन मी तुमच्यामध्ये आहे. पण करुणेने भरलेले अंतःकरण त्या पीडित कुटुंबांच्या सोबत आहे. असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.