नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते पहिल्यांदाच इटली दौरा करत आहेत. इटलीमध्ये होणाऱ्या 50 व्या जी-७ (G7) शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून ते १५ जूनपर्यंत दरम्यान इटली दौऱ्यावर आहेत.
PM मोदींची जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक
14 जून रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीने भारताला आमंत्रण दिले आहे. मार्च 2023 मध्ये मेलोनी यांच्या भारत भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दुसरी भेट आहे. शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही होणार आहे.