सिंधुदुर्ग : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत.आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनासाठी त्यांचे मुंबई येथे आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंगल प्रभात लोढा, आ. आशिष शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.