
नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या भारतीय सशस्त्र दलाच्या मोहिमेचे कौतुक केले आहे. या कारवाईला 'अचूक आणि शक्तिशाली' अशी उपमा देत, अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला आहे.
अंबानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देश दहशतवादाविरुद्ध एकजूट, दृढनिश्चयी आणि निश्चयाने अढळ उभा आहे. रिलायन्स कुटुंब भारताची एकता आणि अखंडता जपण्यासाठी कोणत्याही उपाययोजनांना पाठिंबा देण्यास तयार आहे. त्यांनी असेही नमूद केले की, भारत शांततेच्या बाजूने नेहमीच राहिला आहे, मात्र त्याच्या स्वाभिमान, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्वासमोर कुठलीही तडजोड करणार नाही.