लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक, दोन अज्ञात संसदेत घुसले

Edited by: ब्युरो
Published on: December 13, 2023 16:15 PM
views 160  views

दिल्ली : शाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभाचं  (Loksabha Session) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी संसदेत उडी मारली. त्यांच्या हातात काहीतरी सामान होतं. अज्ञात व्यक्तीने खासदार बसत असलेल्या बेंचवरुन उड्या मारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक आणि खासदारांनी मिळून या व्यक्तीला पकडलं आणि पोलिसांकडे सोपवलं. या घटनेनंतर लोकसबेची कार्यवाही स्थगित करण्यात आली. संसदेवर हल्ला झाल्याच्या घटनेला आज बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आजच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

सभागृहाचे सदस्य नसताना तीन अज्ञात व्यक्ती संसदेत घुसरल्याने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दोन आरोपींना अटक करण्यात आलं असू यापैकी एकाच नाव  सागर असल्याचं समजतंय. दोन्ही आरोपींना संसद मार्ग पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलं. कोणत्या उद्देशाने हे दोन आरोपी संसे घुसले याचा पोलीस तपास करत आहेत.