नारायण राणेंनी घेतली खासदारकीची शपथ ; निलेश राणे भावूक

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 25, 2024 07:41 AM
views 622  views

सिंधुदुर्ग : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. राणे यांनी हिंदीतून शपथ घेतली. यानंतर राणे यांचे जेष्ठ चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी एक्स वर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निलेश राणे म्हणाले, १९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार.

ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. 

तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही.

जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. 

कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे असे निलेश राणे म्हणाले.