ब्युरो न्यूज : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारपासून म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 84 हजार कोटींहून अधिकची घसरण झाली आहे.
खरेतर, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफा आणि महसुलाच्या संदर्भात मांडण्यात येत असलेल्या अंदाजांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. रिलायन्सच्या तिमाही निकालांनुसार नफ्यात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिलायन्सच्या शेअर्समध्ये गुरुवारी 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्सचा शेअर 2.11 टक्क्यांनी घसरून 2,472.10 रुपयांवर बंद झाला. आज म्हणजेच गुरुवारी, कंपनीचा शेअर 2,525 रुपयांवर उघडला आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान 2,531.90 रुपयांवरही पोहोचला, परंतु शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे तोही सत्रात 2,465.65 रुपयांसह दिवसाच्या खालच्या पातळीवर गेला. तसे, एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 2,525.50 रुपयांवर बंद झाला होता.
सोमवारपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. सोमवारी बाजार बंद झाला, तेव्हा कंपनीचा शेअर 2,596.55 रुपयांवर होता. त्यानंतर मंगळवारपासून घसरणीची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रति शेअर 124.45 रुपयांची घसरण झाली आहे. याचा अर्थ मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत कंपनीचा शेअर 4.79 टक्क्यांनी घसरला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवस घसरण सुरू आहे, त्यामुळे कंपनीचे मूल्यांकन सातत्याने कमी होत आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे मूल्यांकन 17,56,690.54 कोटी रुपये होते, ते आज 16,72,494.15 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच या कालावधीत कंपनीच्या मार्केट कॅपला 84,196.39 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यातही कंपनीच्या मूल्यांकनात घट झाली होती.