रद्दी, भंगार विकून मोदी सरकारची तब्बल 254 कोटींची कमाई !

67 हजार कार्यालयांमध्ये राबवण्यात आलं विशेष अभियान
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 28, 2022 17:03 PM
views 256  views

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेमधून धडा घेत केंद्र सरकारने मागील तीन आठवड्यांमध्ये सरकारी कार्यालयांमधून रद्दीतील फाइल्, ई-कचरा आणि फर्नीचर विकून तब्बल २५४ कोटी २१ लाख रुपयांची कमाई केली आहे. इतकच नाही तर या गोष्टी भंगारामध्ये काढल्याने एवढी मोठी जागा रिकामी झाली आहे की त्यामध्ये संपूर्ण सेंट्रल विस्टासारखा एखादा प्रकल्प उभा राहू शकतो. रद्दी आणि भंगार काढल्याने सरकारी कार्यालयांमधील ३७ लाख स्वेअर फूट जागा रिकामी झाली आहे. भारतीय पोस्ट विभागामधूनही दिल्लीतील कार्यालयामधील बऱ्याच जुन्या वस्तू भंगार आणि रद्दीत काढण्यात आल्या आहेत. यानंतर रिकाम्या झालेल्या जागेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कॅंटीन आणि गॅलरी तयार केली आहे. या कॅंटीनचं नाव आंगन असं ठेवण्यात आलं आहे.


मुख्य पोस्ट जनरल मंजू कुमार यांनी अनेक वर्षांपासून या ठिकाणी कचरा आणि अडगळीत टाकलेल्या सामानाचा ढीग होता. यामध्ये रद्दी, खरा झालेले एसी, कूलर, कंप्युटरबरोबरच फर्नीचरचाही समावेश होता. डेप्युटी डारेक्टर जनरल अमरप्रीत दुग्गल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता मोहिमेतून प्रेरणा घेत आम्ही या गोष्टी भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. यामधून जी कमाई झाली त्यातून कॅंटीन आणि गॅलरी तयार करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या देशभरातील वेगवेगळ्या विभागांच्या कार्यालयांमध्ये अशाप्रकारची स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय पोस्ट विभागाची १८ हजार, रेल्वेची सात हजार स्थानकं, वैद्यकीय विभागाशी संबंधित सहा हजार, संरक्षण विभागाच्या साडेचार हजार, गृह मंत्रालयाशी संबंधित चार हजार ९०० वेगवेगळ्या कार्यालयांचा समावेश आहे. या सरकारी कार्यालयामधील अडगळीतील वस्तूंची विक्री केली जाणार असून कारण नसताना अडकून पडलेल्या जागा मोकळ्या केल्या जाणार आहे. यामधून सरकारला चांगले पैसेही मिळत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशाप्रकारची स्वच्छात मोहीम भविष्यात इतरही कार्यालयांमध्ये राबवली जाईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.


२ ऑक्टोबरपासून ही विशेष स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ६७ हजार कार्यालयांचा समावेश आहे. या मोहीमेदरम्यान ४० लाख फाइल्स आणि ३७.१९ लाख स्वेअर फूट जागा खाली केली जाणार आहे. या मोहीमेबद्दल प्रसार भारती न्यूजशी बोलताना केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली होती. मोदींनी दिलेल्या या संदेशानंतर सर्वांनीच स्वच्छता मोहीम हाती घेतली,” असं सांगितलं. यापूर्वी अशाप्रकारची मोहीम मागील वर्षी राबवण्यात आलेली, त्यावेळी सरकारची ६२ कोटींची कमाई झाली होती.