मुंबई : मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत. राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दाखवली आहे.
याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सचिन तेंडूलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.