पुतण्‍याने काकाला बनवला ‘मामा' !

काकूशी प्रेमविवाह ; काकाही उपस्‍थित
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 22, 2025 13:53 PM
views 750  views

नात्‍यांना काळीमा फासणार्‍या घटनेची चर्चा

पटना : आतापर्यंत प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे प्रेमवीर, प्रेमिका पाहिल्‍या असतील. पण आता बिहारमधुन प्रेमात आंधळी झालेल्‍या एका महिलेचा प्रताप समोर आला आहे. या महिलेने तिच्या दिराच्या मुलाशी म्‍हणजेच पुतण्याशीच प्रेमविवाह केला आहे. विषेश म्‍हणजे पूतण्या - काकूच्या या विवाहासाठी काका म्‍हणजेच महिलेचा पतीही उपस्‍थित होता. काकासमोरच पुतण्याचे काकीला वरमाला घातली. नात्‍यांना काळीमा फासणार्‍या या घटनेची सध्या चर्चा सुरु आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की जुमई जिल्‍ह्यातील सदर पोलिस ठाणे क्षेत्रातील सिकहरिया या गावात हा प्रकार घडला आहे. या गावातील रहिवासी विशाल दुबे यांची पत्‍नी आयुषी कुमारी हीने गावातच राहणारा पुतण्यासोबतच लग्‍न केले. ही घटना शुक्रवार २० रोजी समोर आली आहे. गावातीलच एका मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला.

२०२१ मध्ये विशालबरोबर आयुषीचा विवाह झाला होता. या लग्‍नाची तिला तीन वर्षाची एक मुलगी पण आहे. दरम्‍यान शेजारी राहणारा विशालचा पुतण्या सचिन बरोबर काकू आयुषी हिचे सूत जुळले, गेली दोन वर्षे हा प्रकार सुरु होता. भेटी गाठी, मोबाईलवरुन संभाषण हे नवीन प्रेमीयुगलासारखे सुरु होते. तेही या दोघांच्या कुंटुंबाला न कळता.

घटस्‍फोटासाठी अर्ज केला लगेच लग्‍नही उरकले

या दोघांमधील गोष्‍ट जेव्हा हे दोघे गेल्‍या रविवारी पळून गेले तेव्हा समोर आली. विशाल यांनी आपली पत्‍नी बेपत्ता झाली असल्‍याची तक्रार सदर पोलिस ठाण्यात दिली होती. त्‍याचेवेळी आयुषी कुमारी हिने जमुई कोर्टात घटस्‍फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तसेच विशाल व तिच्या मुलीला स्‍वीकारण्यासही नकार दिला आहे. त्‍यानंतर या दोघांमध्येही सामोपचार होऊन पतीच्या कुटुंबाच्या साक्षीने तिने सचिनबरोबर शुक्रवारी लग्‍नच केले.

पत्‍नीच्या प्रेमविवाहाला पतीची उपस्‍थिती

दरम्‍यान दोघे पळून गेल्‍यानंतर दोन्ही कुंटुंबानी त्‍यांना परत आणले व त्‍यांचा विवाह लावून दिला यावेळी आयुषीचा पती विशाल दुबेही हजर होता. सचिन दुबे हा आयुषीला नात्‍याने पुतण्या लागतो व तो शेजारीच राहतो. सुरवातीला सोशल मिडीयातून त्‍यांचे चॅटींग होत असे. हळू हळू दोघांमध्ये प्रेम सुरु झाले. व त्‍यांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला

आता याबाबत सचिन दूबे याची प्रतिक्रीया समोर आली आहे. तो म्‍हणतो की मी व आयुषी गेली दोन वर्षे एकमेकांवर प्रेम करतो आहे. आता आमच्या लग्‍नामुळे आमच्या नात्‍याला नाव मिळाले आहे. मी आयुषीला जीवनभर आनंदी ठेवीन असेही म्‍हटले आहे. 

तर आयुषीचा पहिला पती विशाल म्‍हणतो की आयुषी जर खूष राहत असली तर मी तिला थांबविणार नाही. पण मी तिच्यासोबत कधीही वाईट वागलो नाही. पण ती नेहमीच मला व माझ्या मुलीला हीन वागणूक देत असे. असा आरोपही त्‍याने केला आहे.