पाचव्या टप्प्यातील ४९ मतदारसंघात मतदानाला सुरुवात !

Edited by: ब्युरो
Published on: May 20, 2024 05:08 AM
views 128  views

ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील देशातील ४९ जागांवर आज मतदान सुरू आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार देशात १०.२८ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्र ६.३३ टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये ८.८६ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ७.६३ टक्के, झारखंड ११.६८ टक्के, लडाख १०.५१ टक्के, ओडिशा ६.८७ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १५.३५ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वा. पासून सूरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सकाळी संथगतीने मतदान सुरू आहे.