पणजी : गोव्याची राजधानी पणजी शहर मंगळवारी जिओ ट्रू ५-जी नेटवर्कशी जोडले गेले. याचवेळी १७ राज्यातील ५० शहरांमध्ये एकाच दिवशी ५-जी लाँच करून जिओने एकप्रकारे विश्वविक्रम केला.
मंगळवारपासून, जिओ वेलकम ऑफर पणजी सह १७ राज्यांमधील ५० शहरांमध्येही सुरू झाली. ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय १ Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.
याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पणजीमध्ये जिओची ५-जी सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून पणजी शहरात ५-जी सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे.
आम्ही जिओ ट्रू ५-जी तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह पणजी आणि गोव्यातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. गोवा डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही गोवा सरकारचे आभारी आहोत.”
मंगळवारपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.
जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने ४-जी नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू ५-जी नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू ५-जीसह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते. जसे की, कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, ५-जी व्हॉईस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाईसिंग.
जिओ ट्रू ५-जी सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ ५-जी नेटवर्क सुसंगत ५-जी हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी ५-जी नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी २३९ किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल.