एकीकडे रशिया - यु्क्रेन युद्धाच्या परिणामांमधून या दोन्ही देशांसह इतर अनेक देश अद्याप सावरू शकले नसताना पुन्हा एकदा जगाला आणखी एका युद्धाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इस्रायलनं पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे गाझा पट्टी व आसपासच्या भागात या युद्धाचे तीव्र परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.