संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये इस्रायलव्याप्त पॅलेस्टाईनमधील कारवायांचा निषेध करणाऱ्या ठरावाच्या बाजुने भारताने मतदान केले. महासभेमध्ये रविवारी मांडण्यात आलेल्या एकूण सहा ठरावांपैकी पाच ठरावांच्या बाजुने भारताने मतदान केले, तर एका ठरावावर भारत तटस्थ राहिला.संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये ‘स्पेशल पॉलिटिकल अँड डी-कॉलनायेशन कमिटी’ने ९ नोव्हेंबरला सदस्य देशांची मते नोंदवून पॅलेस्टाईन प्रश्नासह पश्चिम आशियातील परिस्थितीशी संबंधित सहा ठरावांचा आराखडा मंजूर केला होता.