युद्धग्रस्त पॅलेस्टाईनला भारताकडून मदत रवाना..!

Edited by:
Published on: October 23, 2023 11:25 AM
views 156  views

भारताने रविवारी युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी वैद्यकीय मदत आणि अन्य उपयुक्त साहित्याची मदत पाठविली. हवाई दलाचे ‘सी-१७’ मालवाहू विमान इजिप्तच्या अल-अरिश विमानतळाकडे सामग्रीसह रवाना झाले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी ‘एक्स’ संदेशाद्वारे याबाबत दिली. ‘भारताने पॅलेस्टाईनवासीयांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पाठवली आहे. अंदाजे साडेसहा टन पूरक वैद्यकीय साहित्य आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन हवाई दलाचे विमान इजिप्तकडे रवाना झाले आहे. यात जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त साधने, तंबू, बिछाने, ताडपत्री, स्वच्छता साहित्य, जलशुद्धीकरण औषधे आदीचा समावेश आहे,’ अशी माहिती बागची यांनी दिली.