सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यात ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केले. त्यात माजगाव ग्रामपंचायतीला मशरूम गोवर व असिस्टंट कार्पेटर केंद्राचा समावेश असून त्याचाही शुभारंभ करण्यात आला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास महाराष्ट्र राज्य आयोजित प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ग्रामपंचायत माजगाव केंद्रावर ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
माजगाव ग्रामपंचायतीच्या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सिध्दीविनायक सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सरपंच डॉ. अर्चना सावंत, माजी सभापती अशोक दळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, दिनेश सावंत, आर के सावंत, संजय कानसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर, तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांसह ७०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सौ अर्चना सावंत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सरपंच डॉ.अर्चना सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.