
ब्युरो न्यूज - सध्या जगभरात युक्रेन रशिया युद्धाची चर्चा जोरदार सुरु आहे .त्यातच अजून एक अशी बातमी समोर येतेय कि युक्रेन आणि रशियाच्या हल्ल्यांमध्ये काळ्या समुद्राजवळील घरे आणि तेल डेपोवर मोठा परिणाम झाला आहे.येथील स्थानिक अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे कि , युक्रेनच्या दक्षिणेकडील मायकोलाईव्ह शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे घरे आणि नागरी पायाभूत सुविधा उध्वस्त झाल्या आहेत.
काळासमुद्र असलेल्या या शहरात जिथे रशियन सैन्याने वारंवार गोळीबार केला आहे तिथे साधारण तीन नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे .क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेन मधील राज्य आपत्कालीन सेवेने घटनास्थळी धाव घेतली.आणि अग्निशामक दलातील काही जवानांचे फोटो पोस्ट केलेत.रविवारी पहाटे रशियाच्या काळ्या समुद्रातील रिसॉर्ट सोचीजवळी तेल डेपोला मोठी आग लागली होती. रशियातील अधिकार्यांनी युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे हे झालाय असे वक्त्यव केले.त्यामुळे याच भागातील एडलर जिल्यातील सोची विमानतळावरील उड्डाणे स्थगित करण्यात आली.
क्रास्नोडार प्रदेशाचे गव्हर्नर वेनियामिन कोंड्रात्येव यांनी टेलिग्रामवर सांगितले की ड्रोनचा हल्ला हा इंधन टाकीवर पडला आणि आता १२७ अग्निशामकदल आग विझवण्याचे काम करत आहे.हा ड्रोन हल्ला म्हणजे युक्रेनने या आठवड्यात केलेल्या अनेक ड्रोन हल्ल्यांपैकी एक हल्ला होता . या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत व्होरोनेझच्या राज्यपालांनी सांगितले की या एका ड्रोन हल्ल्यात चार लोक जखमी झाले आहेत.या नंतर गुरुवारी कीव येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर किमान ३१ लोकांचा यात मृत्यु झाला आहे यावर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या आठवड्यात रशियावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक कठोर निर्बंध लादण्याची मागणी केली.
युक्रेन मधील अधिकाऱ्यांच्या वक्त्यव्यानुसार या हल्ल्यात ३०० हून अधिक लोक आणि आठ क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आलीत.ज्यामुळे २०२२ पासून रशियाने आक्रमण सुरु केल्यानंतर आत्ता राजधानीवर झालेला हा हल्ला सर्वात घातक हल्ला ठरला आहे.