सिक्कीममध्ये हाहाकार | ९ लष्करी जवानांसह ३२ जणांचे मृतदेह सापडले

Edited by:
Published on: October 09, 2023 09:58 AM
views 532  views

सिक्कीमला उद्धवस्त करणाऱ्या तिस्ता नदीच्या आकस्मिक पुराचा चिखल आणि ढिगारे यांतून आतापर्यंत नऊ लष्करी जवानांसह ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याच वेळी, अद्यापही बेपत्ता असलेल्या शंभरहून अधिक जणांचा शोध सुरूच आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.