Gujarat Exit Poll 2022 : गुजरातमध्ये पुन्हा भाजपच येणार !

तब्बल 128 ते 149 जागांचा व्यक्त होतोय अंदाज
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 05, 2022 19:58 PM
views 330  views

ब्युरो न्युज : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीचं दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर आता याच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल यायला लागले आहेत. यावेळीही गुजरातमध्ये पुन्हा भाजप बहुमतामध्ये येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त होत आहे.


'टीव्ही ९'च्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपला १२८ ते १४९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर काँग्रेस - ३० ते ४२, आप- २ ते १० आणि अपक्षांना ० ते ३ जागा मिळतील असा एक्झिट पोल रिपोर्ट आलेला आहे.


P-MARQच्या सर्व्हेनुसार, भाजपला १२८ ते १४८ जागा मिळतील, काँग्रेसला ३० ते ४२ जागा मिळतील आणि आपला २ ते १० जागांवर समाधान मानावं लागेल. दोन्ही सर्व्हेमध्ये भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असं एक्झिट पोल सांगत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये असंही सत्ताधारी पक्षाला पुन्हा बहुमत मिळत नाही, असा प्रघात आहे. अंतिम निकालाबाबतच याची स्पष्टता येईल.


गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७ मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली.