अहमदाबाद : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. गुजरातमध्ये भाजपा 150 जागांवर, तर काँग्रेस 19 जागांवर आघाडीवर असून आप 10 जागांवर आघाडीवर असल्याचं सकाळी 10 पर्यंतच चित्र आहे.
मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच तासात भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धूळ चारत मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. यापूर्वी भाजपने गुजरात विधानसभेत सर्वाधिक १२७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा भाजपकडून हा विक्रम मोडीत काढला जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला जाण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपने १३१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार ४८ जागांवर, आप ३ आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर आघाडीवर आह
यापूर्वी एक्झिट पोल्सनी गुजरातमध्ये भाजपला एकतर्फी विजय मिळेल, असा अंदाज वर्तविला होता. गुजरातमध्ये हा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. किंबहुना एक्झिट पोल्समध्ये वर्तविलेल्या अंदाजापेक्षा भाजपला जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजय मिळवू शकतो, असे संकेत सुरुवातीच्या काही तासांमध्ये दिसत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता गुजरातमध्ये भाजप अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरवर मात करून पुन्हा सत्ता प्रस्थापित करेल, असे चित्र दिसत आहे.