
ब्युरो न्यूज : जागतिक बाजारपेठेत होत असलेलीअस्थिरता, अमेरिकी टॅरिफ धोरण आणि गुंतवणूकदारांच्या खरेदीचा परिणाम भारतीय कमोडिटी मार्केटवर स्पष्टपणे दिसून येतो आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारातही सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ७०० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात १,००० रुपयांची उसळी पाहायला मिळत आहे.
जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ८२० रुपयांनी वाढून ₹१,०२,२२० इतका झाला आहे. २२ कॅरेट सोनं ७५० रुपयांनी वाढून ₹९३,७०० वर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर देखील ६२० रुपयांनी वाढून ₹७६,६७० इतका झाला आहे. GST सहित २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,०३,५०० इतका आहे. चांदीच्या किमतींचाही उच्चांक नोंदवण्यात आला असून १ किलो चांदीचा दर ₹१,१९,५०० इतका आहे, तर GST सहित किंमत ₹१,१६,३०० रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही आज सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात ०.५ टक्के आणि चांदीच्या दरात १ टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक अस्थिरता, डॉलरमध्ये होणारे चढ-उतार, अमेरिकी टॅरिफ धोरण आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं-चांदीकडे झुकणारी गुंतवणूकदारांची मानसिकता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम या दरवाढीत दिसून येतो आहे.
सोने किंवा चांदी दरानुसार ग्रॅममध्ये पाहिल्यास, २२ कॅरेट सोनं १ ग्रॅमसाठी ₹९,३७०, २४ कॅरेट ₹१०,२२२ आणि १८ कॅरेट ₹७,६६७ इतकं आहे. ८ ग्रॅमसाठी अनुक्रमे ₹७४,९६० (२२ कॅरेट), ₹८१,७७६ (२४ कॅरेट) आणि ₹६१,३३६ (१८ कॅरेट) हे दर आहेत. १० ग्रॅमसाठी दर अनुक्रमे ₹९३,७००, ₹१,०२,२२० आणि ₹७६,६७० आहेत.
मुंबई आणि पुणे शहरांमध्येही हेच दर लागू आहेत. २२ कॅरेटसाठी ₹९३,७००, २४ कॅरेटसाठी ₹१,०२,२२० आणि १८ कॅरेटसाठी ₹७६,६७० इतकी किंमत आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ₹९,२९२.७० असून, २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ₹१०,१३७.७० आहे. चांदीचा दर १ किलोसाठी ₹१,१९,५०० रुपये इतका आहे.
सणासुदीच्या काळात सोनं-चांदीची खरेदी करणे हा भारतीय परंपरेचा एक भाग मानला जातो. त्यामुळे या दरवाढीकडे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांचीही नजर लागून राहिली आहे. काहींसाठी ही खरेदीची संधी असू शकते, तर काहींसाठी ही दरवाढ चिंता निर्माण करणारी ठरू शकते. आगामी दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार दर स्थिर राहतील का ? की आणखी वाढतील ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.