सिंधुदुर्ग : कोकणचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. कोकणवासिय जगाच्या कानाकोपऱ्यात असला तरी गणपतीत कोकण गाठतो. मात्र, आता हा उत्सव देशविदेशात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुबईतील महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट पेशवा येथे जोशी दांपत्य महाराष्ट्रातील सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. बाप्पाची ११ दिवस प्रतिष्ठाना करून गणेशोत्सव देखील दुबईत धुमधडाक्यात साजरा केला जातो.
रेस्टॉरंटमध्ये कोकणातील विशेषत: सिंधुदुर्गतील मुलं या उत्सवात पुढाकार घेऊन गणेशाची पूजा, सजावट, गोडा धोडाचा नैवेद्य, मोदक करंज्यांसह पारंपरिक पद्धतीने कोकणी संस्कार दुबईत जपले जात आहे. यंदा मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा पांडुरंग गावडे व कोकणातील सहकाऱ्यांनी दुबईतील गणरायाच्या चरणी साकारला आहे. यासाठी पेशवा रेस्टॉरंटचे मालक सचिन जोशी, श्रेया जोशी, सिद्धांत जोशी आदींच सहकार्य त्यांना लाभलं.
दुबई असलो तरी भारतातील सण, उत्सव, परंपरा आम्ही जपत आहोत.पांडुरंग गावडे, संदीप जंगलेसह कोकणातील मुलांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवाला भव्यदिव्य असं स्वरूप दिलं आहे. ११ दिवस बाप्पाची सेवा आरती, भजनाच्या करणार आहे अशी भावना सचिन जोशी यांनी व्यक्त केली.