G-20 परिषदेला आजपासून सुरुवात ; नारायण राणेंनी केले उद्घाटन !

आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: January 16, 2023 10:59 AM
views 388  views

पुणे : जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील. 

IWG सदस्य राष्ट्रे, अतिथी राष्ट्रे आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. यादरम्यान ते भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली २०२३ च्या पायाभूत सुविधांच्या अजेंडावर चर्चा करतील.

नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, "मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी 20 ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धनयवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत."

"शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर  दृष्टिकोन बदलतो", असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. 


राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. यावर देखील नारायण राणे यांनी भाष्य केले. कोणतेही उद्योग बाहेर जात नाही आहेत. या मिस गाईड करणाऱ्या बातम्या आहेत. जे राज्य करात सवलत देतात. तिथे बाहेरच्या कंपन्या येऊन गुंतवणूक करतात. देशाच्या इतर भागापेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत. त्यामुळे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जातात पण ते परत येतात. माझ्या जवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रिपद आहे. उद्योग महाराष्ट्रात आणण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०० कोटीचा ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यात येईल, असे नारायण राणे यांनी सांगितले.