ब्युरो न्युज : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. रायपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. सोनिया गांधींची या घोषणेमुळे त्या राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देत आहेत.
रायपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला संबोधित करताना काग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी मोठी घोषणा केली आहे. गेली काही वर्षे सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात फारशा सक्रीय नाहीत. त्यानंतर आता त्यांनी ही घोषणा केल्यामुळे त्या राजकारणातून देखील निवृत्त होतील असे मानले जात आहे.