रुपया कमजोर नाही हो...डॉलर मजबूत होतोय ; असं केंद्रीय अर्थमंत्री म्हणतायत

रुपयाच्या घसरणीवर अर्थमंत्र्यांचा अजब दावा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 17, 2022 10:23 AM
views 253  views

नवी दिल्ली : रेकॉर्डब्रेक महागाई आणि मंदीचे सावट यामध्ये डॉलरच्या तुलने रुपयाची घसरण सुरु आहे. रुपयाने  डॉलरपुढे सपशेल नांगी टाकली आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपया 82.69 रुपये आहे. म्हणजेच एका डॉलरसाठी तुम्हाला 82.69 रुपये खर्च करावे लागतील. आता तज्ज्ञांच्या मते, डॉलरची एवढी मजबूती आणि रुपयाची एवढी घसरण चिंताजनक आहे. पण केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या उत्तरात ट्विस्ट आणला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दावा केला की, इतर देशांच्या चलनाचा विचार करता भारताचा रुपया दमदार कामगिरी करत आहे. त्यांनी भविष्यात बाजारातील उभरते चलनाविषयी चर्चेदरम्यान त्यांनी हा दावा केला.

इतर देशांच्या चलनांच्या मानाने रुपयाचे प्रदर्शन चांगले असल्याचे हे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देशाच्या चलनाच्या मानाने रुपयाचे प्रदर्शन चांगले असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची रेकॉर्डब्रेक घसरण झाल्यानंतर अर्थमंत्र्यांचे हे वक्तव्य केले आहे.

त्यापुढे जाऊन सीतारमण यांनी डॉलर दिवसागणिक मजबूत होत असल्यानेच रुपयाची घसरण होत असल्याचा अजब दावा केला. रुपया कमजोर होत नसल्याचा दावा त्यांनी केला. त्याऐवजी डॉलर मजबूत होत असल्याचा युक्तीवाद अर्थमंत्र्यांनी केला. सीतारमण सध्या अमेरिकन दौऱ्यावर आहेत.

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना दिसत नाही. परिणामी भारतीय केंद्रीय रिझर्व्ह बँकही बाजारात दखल देत नसल्याचे त्यांनी सांगितले. रुपयाच्या घसरणीवर थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं. अमेरिकन डॉलरच्या तुलने भारतीय रुपया मजबूत स्थिती असल्याचा दावा त्यांनी केला.