सिंधुदुर्ग : आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा वार्षिक दहिकाला जत्रोत्सवाचा शुक्रवारपासून शुभारंभ होतोय. लौकिकप्राप्त दर्जेदार अभिनय संपन्न नावलौकिक कलाकारांच्या संचात हि कंपनी यंदा लोकआवडीनुसार जुने -नवीन नाट्यपुष्पे सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे.
या कंपनीच वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीचा गणपतीचा पेटारा परंपरेनुसार भरपूर जुना असून नवसाला पावणारा पहिला मानाचा उजव्या सोंडेचा गणपती. अनेक ग्रामस्थांचे, भाविकांचे नवस आमच्या बाप्पाने पूर्ण केलेत त्यामुळे आमच्या पेटाऱ्याला जत्रोस्तवात एक वेगळाच मान असतो. अनेक कलाकार ग्रामस्थ यांना या गणपतीच्या कृपाशिर्वादाची प्रचिती आली आहे. या मंडळाचे मालक श्री.मनोजकुमार उर्फ भाऊ आरोलकर तसेच या मंडळाचे संचालक श्री.सौरभ पाटकर आहेत. तसेच या मंडळात आनंद नार्वेकर, पप्पू चव्हाण, प्रशांत मेस्त्री, बाळा हळदणकर,शेखर काकतकर, पप्पू मेस्त्री, सुनील बंगे ,बाबू राणे, तुषार बांदेकर, श्रीनाथ गवस, पिंकू राणे आदी कार्यरत आहेत. तसेच हार्मोनियम वादक नितीन गावडे, पखवाज वादक राजेश उर्फ दादा आकेरकर, युवा झांजवादक संतोष गुडूळेकर यांची सदाबहार संगीत साथ लाभलेली आहे.