ब्युरो न्युज : भारतासह संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोनाने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली असून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. तज्ज्ञांनी लोकांना मास्क घालण्यास, लसीकरण करून घेण्यास आणि नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, यूएसमधील शास्त्रज्ञांनी एक अँटीबॉडी शोधून काढली आहे, जी ओमिक्रॉनसह कोविड-19 ला कारणीभूत असलेल्या व्हायरसच्या सर्व महत्त्वाच्या प्रकारांचा प्रसार रोखते. या शोधामुळे अधिक शक्तिशाली लस आणि नवीन अँटीबॉडी-आधारित उपचार मिळू शकतात.
जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील वेल कॉर्नेल मेडिसिनचे ज्येष्ठ लेखक डॉ. पॅट्रिक विल्सन आणि सहकाऱ्यांनी साथीच्या महामारीदरम्यान उद्भवलेल्या व्हायरसच्या सिरीयल वर्जन्सविरोधात रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांमधून अँटीबॉडीजची चाचणी केली. यापैकी एक प्रथिने S728-1157 आहे. हे केवळ जुने प्रकारच नव्हे तर ओमिक्रॉनच्या सात उप-प्रकारांनाही थांबवण्यात खूप प्रभावी ठरलं. या टीममध्ये स्क्रिप्स रिसर्च आणि शिकागो विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश होता.
डॉ. विल्सन म्हणाले, महामारी संपत आहे, पण हा विषाणू बराच काळ राहील. त्याचे नियंत्रण नीट केले नाही तर दरवर्षी हे महामारीचं कारण बनेल. ते म्हणाले, हे अँटीबॉडी आणि त्यातून मिळणारे इनसाइट्स आपल्याला कोविड-19 किंवा कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये होणारी वार्षिक वाढ टाळण्यास मदत करू शकते.
डॉ. विल्सनच्या टीमने विषाणूच्या स्पाइक प्रोटीनला चिकटलेल्या अँटीबॉडी तयार करणाऱ्या पेशींचे विश्लेषण केले, ज्याचा वापर ह्यूमन सेल्समध्ये प्रवेश करण्यासाठी करतात. आणखी एक संशोधक लेखक, डॉ सिरिरुक चांगरोब यांनी व्हायरसच्या मूळ प्रकारासह SARS-CoV-2 च्या 12 प्रकारांविरूद्ध आढळलेल्या अँटीबॉडीची चाचणी केली. S728-1157 नावाचा अँटीबॉडी Omicron शी सामना करू शकतो.
परिणाम सूचित करतात की S728-1157 पारंपारिक अँटीबॉडी-आधारित उपचारांसाठी अत्यंत आवश्यक पर्यायाचा आधार बनू शकतो. संशोधनात असे म्हटले आहे की संशोधन नवीन लसींच्या रचनेचे मार्गदर्शन करू शकते, जे स्पाइक प्रोटीनवर अवलंबून असतात आणि अँटीबॉडीज वाढवतात.