अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमध्ये नेणार आहे. निवडणुकीनंतर होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी आणि आमदारांची पळवापळवी थांबवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यात उशीर झाला होता. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही केवळ निर्णय न घेतल्याने भाजपने सत्ता स्थापन करून बाजी मारली होती. त्याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.