नवी दिल्ली : भारताचे सध्याच्या सरन्यायाधीश यू यू लळित यांनी नुकतीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड हे ५० वे सरन्यायाधीश होणार आहेत. सरन्यायाधीश यू यू लळित यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांनी भारताच्या पुढच्या सरन्यायाधिशाच्या नावाची शिफारस केली आहे.
चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश ठरणार
भारताचे सरन्यायाधीश यू यू लळित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना आज सकाळी यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली होती. यावेळी लळित यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची शिफारस करणारे पत्र सर्वाच्या उपस्थितीत सुपूर्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी भावी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने या नावाला होकार दिला तर न्या. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश ठरणार आहेत.