नवी दिल्ली : आता सरकार रस्त्यावरचे छोटे विक्रेते ठेलेवाले आणि फेरीवाल्यांना ३ ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोप्या पद्धतीनं क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकार विशेष लक्ष देणार आहे. प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड योजना जून २०२० मध्ये सूक्ष्म-क्रेडिट सुविधा म्हणून सुरू करण्यात आली. कोविड-१९ महामारीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना बळकट करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
पीएम स्वानिधी योजना ही एक सरकारी योजना आहे. कुटिरोद्योगात गुंतलेल्या लोकांना आर्थिक सहाय्य करणे आणि रस्त्यावरील विक्रेते व फेरी वाल्यांचा व्यवसाय वाढवणे तसेच व्यवसाय समोरील आर्थिक समस्या दूर करणे हा त्याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार ५० हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देत आहे. त्याच वेळी, एका वर्षात ही रक्कम परत केल्या नंतर, कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही हमीदाराची गरज भासणार नाही. २४ डिसेंबर २०२४ पर्यंत गरजू लोक या योजने चा लाभ घेऊ शकतात. पण एका कुटुंबातील एकच व्यक्ती पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेअंतर्गत अर्जदार मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे.