गुजरात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं

दोन टप्प्यात होणार निवडणुका
Edited by: ब्युरो
Published on: November 03, 2022 13:59 PM
views 277  views

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होईल. तर ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेश सोबत गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

निवडणूक आयोगाने आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने माहिती दिली. सुरुवातीला आयोगाकडून मोरबी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

गुजरात विधानसभेत 182 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 89 आणि दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर निवडणूक होणार आहेत.

गुजरातमध्ये, 10.10.2022 रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीनुसार, 4.9 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत, त्यापैकी ~ 4.04 लाख PwD मतदार आहेत; 9.8 लाख 80+ ज्येष्ठ नागरिक आणि 4.61 लाख प्रथमच मतदार: CEC कुमार

गुजरातमधील 3.24 लाख अतिरिक्त मतदार पहिल्यांदाच मतदान करण्यास पात्र असतील: EC

गुजरातमध्ये 142 सामान्य, 17 SC आणि 23 ST मतदारसंघ, – CEC राजीव कुमार

दिव्यांगांसाठी खास 152 मतदान केंद्र असतील

महिलांसाठी 1274 मतदान केंद्र असतील ज्याचे व्यवस्थापन पूर्णपणे महिलांकडूनच करण्यात येईल.

प्रथमच, तरुण मतदारांना प्रेरित करण्यासाठी, सर्वात तरुण उपलब्ध मतदान कर्मचार्‍यांकडून 33 मतदान केंद्रे व्यवस्थापित केली जातील.