ब्युरो न्यूज : ज्या ब्रिटनने भारतासारख्या खंडप्राय देशावर 150 वर्ष अत्याचार केले, त्याच ब्रिटनच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाचे ऋषी सुूनक विराजमान झाले आहेत.
रामदास सुनक यांनी १९३५ मध्ये गाव सोडले. तेव्हा ते गाव भारतात होते. गुजरांवाला हे त्यांचे मूळ गाव. आता ते गाव पाकिस्तानमध्ये आहे. शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचे हे जन्मगाव.
तिथून पोटासाठी रामदास आफ्रिकेतल्या नैरोबीत आले. म्हणजे केनियाला आले. तिथे यशवीर सुनक यांचा जन्म झाला. पुढे १९६० मध्ये सुनक कुटुंब इंग्लंडमध्ये गेलं. तिथं यशवीर यांच्या मुलाचा, ऋषी सुनक यांचा १९८० मध्ये जन्म झाला.
ऋषी सुनक यांचे कौतुक आहेच, आपला माणूस इंग्लंडचा साहेब झाला, याचा आनंद आहेच, आमच्या नारायणमूर्ती आणि सुधाताई (कुलकर्णी) मूर्तींची कन्या तिथली 'फर्स्ट लेडी' झाली, याचाही आनंद आहे. ऋषी सूनक मराठी माणसांचे जावई आहेत.
अवघ्या ४२ वर्षांच्या या तरण्याबांड पंतप्रधानांचे कौतुक करायला हवेच.