BREAKING | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीच्या मागणीसाठी धमकी

यापूर्वीही गडकरी यांच्या कार्यालयात आला होता धमकीचा कॉल
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 21, 2023 14:48 PM
views 226  views

नागपूर : राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीच्या मागणीसाठी धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आल्याची माहिती आहे. या बातमीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा कॉल आला होता.


मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे धमकीचे कॉल आहे. मंगळवारी सकाळी दोन वेळा कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे कॉल आले.


या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अशी माहिती आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना याबाबात माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.


नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात आज सकाळी धमकीचे दोन फोन आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. हे कॉल जयेश पुजारी नावाने आले असल्याची तक्रार गडकरींच्या कार्यालयाने पोलिसांना दिली आहे.


दरम्यान, नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी गडकरी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. या धमकीची वास्तविकता ते तपासत आहेत. हा केवळ खोडसरपणा की गंभीर बाब आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यापूर्वी देखील 14 जानेवारी रोजी बेळगाव तुरुंगातून गडकरी यांना कॅाल आले होते, त्याच जयेश पुजारीच्या नावाने पुन्हा गडकरींना धमकी देण्यात आली आहे. 


यापूर्वी 14 जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात 3 वेळा धमकीचे कॉल आले होते. सकाळी 11 वाजता पहिला, 11.30 वाजता दुसरा आणि त्यानतंर दुपारी 12 वाजता हे कॉल आले. या कॉलवरून दाऊदच्या आवाजात गडकरींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धक्कादायक बातमीनंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.