भाजप नेत्याकडून मोदींची रावणाशी तुलना!

पंढरपुरातील मंदिरे पाडण्याच्या निर्णयामुळे केलं वक्तव्य
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 10, 2022 21:23 PM
views 263  views

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रावणासारखे मोदी धार्मिक असल्याचा दावा करून करीत आहेत. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी (१० डिसेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, पंतप्रधान मोदी रावणाप्रमाणेच धार्मिक असल्याचा दावा करतात. असा दावा करून मंदिरे पाडण्याचा काम करत आहेत किंवा त्यावर ताबा मिळवत आहेत. उत्तराखंड आणि वाराणसीमध्ये हेच झालं आहे. आता मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळवून पंढरपूरच्या पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना बनवत आहे. हा नरसंहार रोखण्यासाठी आपण लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं स्वामी यांनी म्हटले.

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपूरमध्ये अहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन्ही मंदिरे तोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजपचे माजी राज्यसभा खासदार नाराज असून त्यांनी कोर्टात जाण्याचा मनोदय केला आहे.

याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील गुजरातमधील प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींची रावणाशी तुलना केली होती. त्यानंतर भाजपने हा गुजरात आणि गुजराती लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं होतं. मल्लिकार्जुन खर्गे यांनी अहमदाबादच्या बेहरामपुरा येथे एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली होती.