BIG BREAKING | उद्याच्या निकालाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?

राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या निकाल ? | सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माहिती दिल्याची 'लाईव्ह लॉ'ची माहिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 10, 2023 17:36 PM
views 334  views

ब्युरो न्युज : जवळपास वर्षभरापासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल जाहीर करू शकते. याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माहिती दिल्याचं 'लाईव्ह लॉ'ने म्हटले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत माहिती समोर आल्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर ते म्हणाले की, ''सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आणि तुमच्याशी बोलतो.'',