नवी दिल्ली : दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. गीतांजली अय्यर यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर वृत्तनिवेदन केले. त्या 76 वर्षाच्या होत्या. 1971 साली त्या दूरदर्शनशी जोडल्या गेल्या. त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला.
गीतांजली अय्यर यांच्या निधनाची बातमी कळताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले, दूरदर्शन आणि इंडिया रेडियोच्य पहिल्या लोकप्रिय इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाची कळताच धक्काच बसला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.