नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. अयोध्येत जाण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असतानाच, दुसरीकडे अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले. अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव अयोध्या धाम असे करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने बुधवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचे आदेश जारी केले. अयोध्येतील राम मंदिराबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दरम्यान, अयोध्या रेल्वे स्थानकाला आधुनिक सुविधांनी युक्त विमानतळासारखे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बनवण्यात येत आहे. मुकुटासह डिझाईनप्रमाणे ते पारंपारिक मंदिरात बांधले जात आहे. स्टेशनच्या या नवीन इमारतीचे उद्धाटन 30 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. स्टेशनच्या उद्धाटनाच्या आधी बुधवारी विविध अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे काम राइटसच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, पुनर्विकासाच्या कामात अनेक आधुनिक सुविधाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विमानातळा सारख्या सुविधांचा समावेश आहे. पण त्याची वास्तू पारंपारिक रचनेवर आधारित आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इमारतीच्या समोर एक भक्कम खांब आहे, ज्याला वाळूचा दगड आहे आणि बाजूच्या टोकाला उंच गोलाकार खांब आहेत, ज्यांना पारंपारिक स्वरूप देण्यासाठी सँडल्टोनचा दगड आहे.स्थानकाच्या मध्यभागी शाही मुकुट सारखी रचना केलेली आहे. तर त्याच्या अगदी खाली असलेली भिंत धनुष्य दाखवते. हे अयोध्येचे भगवाव रामाशी असलेले संबंध प्रतिबिंबित करते. तीन मजली इमारतीत दोन शिखर आहेत, प्रत्येक कोपऱ्यात एक रेल्वे रूळाला तोंड देत आहे, तर त्याच्या दर्शनी भागात दोन छत्री शैलीची रचना आहे. आधीच्या प्रस्ताविक डिझाइनच्या तुलनेत मुखौटेच्या डिझानमध्ये थोडासा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
इमारतीच्या समोर एक टॅक्सी तळ तयार करण्यात आले आहे. पुरर्विकसित स्टेशनमध्ये लहान मुलांसाठी देखभाल,रिटायरिंग रूम, फुड प्लाझा या सुविधा आहेत आणि भविष्यात अजून काही दुकाने असतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.स्टेशनमध्ये एक मोठं विश्रांत रूम, क्लॉक रूम, टॉयलेट सुविधा, लिफ्ट्स, एस्केलेटर आणि अत्याधुनिक चिन्हे आहेत. यात पर्यटक माहिती काउंटरही असेल. त्याच्या मुख्य मध्यवर्ती हॉलच्या मजल्यावर दगडी जडणकाम आहे.22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकपूर्वी 30 डिसेंबरला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपस्थित भव्य कार्यक्रम होणार आहे. हा एक भव्य कार्यक्रम असेल. पंतप्रधान मोदी 30 डिसेंबरला म्हणजेच शनिवारी सकाळीच अयोध्येला पोहोचणार आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदींचा सकाळी 11.15 वाजता रेल्वे स्टेशनवर कार्यक्रम आहे.या कार्यक्रमात, अयोध्या धाम जंक्शनवरील नवीन बांधकामाच्या उद्घाटनासोबतच, पंतप्रधान मोदी दिल्लीतील आनंद विहार ते अयोध्येपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी 12.15 च्या सुमारास पंतप्रधान मोदी अयोध्येत बांधलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी देखील पोहोचतील.लिमिटेड या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे केले जात आहे.