सिंधुनगरी : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड )ची स्थापना १२ जुलै १९८२ रोजी ग्रामीण विकासासाठी झाली. नाबार्डचा ४२ वा वर्धापन दिन १२जुलै २०२३ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कर्यक्रमासाठी देशभरातील राज्य बँकांचे व निवडक जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्रा मधून ३१ जिल्हा बँकांमधून निवडलेल्या बँकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश होता. या कार्यक्रमांमध्ये बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे सहभागी झाले होते.
बदलते हवामानाचा विचार करून कर्ज वितरण तसेच डिजीटल सेवांबाबत कार्यक्रमामध्ये परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. ग्राहकांना डिजिटल पेमेंट अंतर्गत मायको एटीएम द्वारे घरपोच सेवा, दुग्ध उत्पादक व केसीसी कार्डचे वितरण प्रायोगिक तत्त्वावर सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
देशभरातील प्राथमिक विकास संस्थांच्या संगणकीरण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी चालू वर्षात पूर्ण करण्याचे नाबार्डचे धोरण असून सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात ९३विकास संस्थांचे संगणकीकरण होणार असून पूर्व उर्वरित संस्थांचे संगणकीकरण दुस-या टप्प्यात होणार आहे. सिंधुदुर्ग बँकेने जिल्ह्यातील आपल्या सर्व शाखांमधून मायक्रो एटीएम सुविधा यापूर्वीपासूनच उपलब्ध केली असून बँकेच्या बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनापासून (दि. १जुलै २०२३) ही सुविधा बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधी मार्फत सुरू केलेली आहे. जिल्हा बँक महाराष्ट्रातील विविध डिदीटल पेमेंटमध्ये अग्रेसर असल्याची बाब समाधानकारक आहे.