नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांचे पुतणे अजित पवार हे शरद पवारांची भेट घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. हे दोघेही नेते दिल्लीत असून अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार , प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यासह अजित पवार गटाचे प्रमुख नेते शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी 6 जनपथवर पोहोचले आहेत.
या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय भूमिकेत काही बदल होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.