तळ्यात बुडाला मुंबईचा तरुण !

Edited by: ब्युरो
Published on: November 20, 2023 13:02 PM
views 962  views

पणजी : राज्यात पाण्यात बुडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल (ता. १९) सायंकाळी असाच एक प्रकार शिनेर-चिंबल येथील तळ्यात घडला आहे. डॅरिक राज (१८) हा मुंबईचा तरुण पोहोण्यासाठी पाण्यात उतरला होता. तो तिथेच बुडाला. डॅरिक हा चिंबल येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता.

काल सायंकाळी डॅरिक पोहोण्यासाठी तळ्यात उतरला होता. त्याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो आतमध्ये बुडाला. याची माहिती मिळताच जुने गोवा अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी काल सायंकाळी तळ्यात शोध घेतला होता. पण, तो सापडला नाही. त्यामुळे पुन्हा आज सकाळपासून शोध घेतला जात आहेत. दरम्यान, जुने गोवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांनी या घटनेची नोंद केली आहे.