अलाहाबाद : मुस्लिम समाजात बहुपत्नीत्व प्रथा असली तरी अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे हायकोर्टाने इस्लाम धर्मग्रंथ कुराणचा दाखला देत एका मुस्लिम व्यक्तीने दुसरा विवाह करू नये, असं म्हटलं आहे. पहिली पत्नी असताना मुस्लिम व्यक्तीनं दुसरा विवाह करू नये, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
पहिली पत्नी असताना मुस्लिम व्यक्तीनं दुसरा विवाह करू नये
अलाहबाद हायकोर्टाने म्हटलं आहे की, महिलांचा सन्मान करणारा देश सभ्य देश मानला जातो. मुस्लिम व्यक्तीने पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करु टाळायला हवं. पहिली पत्नी असताना तिच्या संमतीविरोधात जाऊन दुसरं लग्न करणं हा पहिल्या पत्नीवरील अन्याय आहे. इस्लाम धर्म पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करण्याची परवानगी देतो. मात्र यामध्ये पहिल्या पत्नीच्या विरोधात जाऊन दुसरं लग्न करणे हा तिच्यावरील अन्याय आहे. पहिल्या पत्नीच्या मर्जीविरोधात दुसरं लग्न करण्याची परवागनी कुराण देत नाही, असं हायकोर्टानं म्हटलं आहे.