मुंबई आणि गुजरातमधून तब्बल १२० कोटींचे ६० किलो ड्रग्ज जप्त

NCB ची मोठी कारवाई |
Edited by: मुंबई प्रतिनिधी
Published on: October 07, 2022 13:02 PM
views 291  views

मुंबई : अंमलीपदार्थाच्या गोदामावर कारवाई करून ५० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. याप्रकरणी गुजरातमधूनही १० किलो एमडी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १२० कोटी रुपये आहे. याप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे. एनसीबीने याप्रकरणी माजी वैमानिक सोहेल गफ्फार याच्यासह दोघांना अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव मुथ्थू असून त्याला यापूर्वीही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही केरळ आणि गुजरातमधील रहिवासी असून जप्त केलेले अंमलीपदार्थ फोर्टमधील कबुतरखाना परिसरातील गोदामात सापडले.

याप्रकरणी गुजरात तेथील जाम नगर येथेही कारवाई करून १० किलो एमडी जप्त करण्यात आले. या टोळीने गेल्या दोन वर्षात २५० किलो एमडीची विक्री केल्याचा संशय आहे. याशिवाय मुंबई व गुजरातमधून मिळून एकूण सहा जणांना पकडण्यात आले आहे.