'बदलत्या काळातील उच्च शिक्षण' या विषयावर रायगड इथं कार्यशाळा

एकलव्य अकॅडमीचं आयोजन | उच्च शिक्षणाच्या संधीबद्दल मिळणार मार्गदर्शन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 13, 2022 21:06 PM
views 269  views

रायगड : एकलव्य अकॅडमीच्या वतीने 'बदलत्या काळातील उच्च शिक्षण' या विषयावर रायगड येथे तीन दिवसांची निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. 14 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत ही कार्यशाळा होईल.

देशातील आणि विदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील उच्च शिक्षणाच्या संधीबद्दल यात मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच सोशल सेक्टर फेलोशिप म्हणजेच गांधी फेलोशिप, टीच फॉर इंडिया, TFI, MGNF,Goonj,SBI YFI. ग्रामीण भागातील आणि पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येईल. देश-विदेशातील विविध नामांकित विद्यापीठांमधील मेंटर्स आणि विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी या कार्यशाळेत मिळणार आहे. गटचर्चा आणि ग्रुप ऍक्टिव्हिटी आधारित सत्रांचा यात समावेश असेल. कार्यशाळेच्या नंतरही सहभागी विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करण्यात येईल.

समाजातील मोठा वर्ग पिढ्यानपिढ्या उच्च शिक्षणापासून वंचित राहिला आहे. आजही उच्च शिक्षणातील ही विषमता कायम असल्याचे दिसून येतं. या वर्गातील पहिल्या पिढीसमोर उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक आव्हाने आणि अडचणी आहेत. तरुणांनी उच्च शिक्षण घेतल्या शिवाय त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास साधता येणार नाही. अशा तरुणांनी  समाजिक शास्त्रातील उच्च शिक्षण घेऊन अर्थपूर्ण करिअर घडवण्याबरोबरच सामाजिक बदल घडवण्यात आपला खारीचा वाटा उचलावा, यासाठी ही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे. 

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), अजीम प्रेमजी विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, आंतरारराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, केंद्रीय विद्यापीठे, आय आय टी (IIT) मानव विद्या शाखा आणि परदेशातील विद्यापीठांत उच्च शिक्षण घेण्यासाठी  कार्यशाळेतून मार्गदर्शन करणार आहोत. एकलव्य अकॅडमी यासाठी प्रयत्नशील असून मागील 4 वर्षांत 300 पेक्षा जास्त तरुणांना देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आणि त्यांचे करिअर घडवण्यात यश मिळाले आहे.

गुगल फॉर्म आणि टेलिफोन संभाषणाच्या आधारे सहभागींची निवड करण्यात येईल. पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असणारे असे, पदवी अंतिम वर्षाला असणारे किंवा पदवी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क संदेश राठोड 97 634 64 735 आणि पायल झाडे 9325188594.

ठिकाण : साने गुरुजी स्मारक, गोरेगाव जवळ, माणगाव, रायगड. 


अधिक माहितीसाठी क्लिक करा

https://linktr.ee/EklavyaIndiaMovement?utm_source=linktree_profile_share<sid=46d9e9a4-b4b7-4422-aadc-02618b24ae41