
देवगड : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील निवडणुकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. देवगड मध्ये जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप महायुती मनसे उबाठा काँग्रेस यांची महाविकास आघाडी या सर्वांचीच सध्या प्रचारात आघाडी असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सर्व आपापल्या मतदारसंघात वाडी वस्त्या गावांमधील रस्ते तुडवत प्रचार करत आहेत.रातरण दिवस प्रचार करत आहेत.डोअर टू डोअर भेट देऊन प्रचार करत आहेत .याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. विविध गावांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.येथील गावांमधील विकासकामे, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण यासंदर्भातील समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यार असल्याचे सर्वच उमेदवार यावेळी सांगत असून कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
मुणगे प. स. मतदारसंघात महायुतीचा प्रचार वेगात माजी सभापती सदाशिव ओगले यांची सातवी टर्म असून मुणगे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार सदाशिव ओगले यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून माजी सभापती राहिलेले. सदाशिव ओगले थेट मैदानात उतरून त्यांनी मुणगे या मतदारसंघातील विविध गावांमध्ये थेट मतदारांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की, तीन वेळा जिल्हा परिषद व तीन वेळा पंचायत समिती मध्ये निवडून गेलो ही माजी ७ वी टर्म आहे.यामुळे हमखास विजयश्री मिळणार यावर दुमत नाही तसेच केंद्र,राज्य आणि जिल्हा पातळीवर एकाच विचाराचं भाजप महायुतीचं सरकार कार्यरत आहे.जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा महायुतीकडे असून माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीतूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे.महाराष्ट्रात महायुतीचे हात अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी महायुतीला साथ द्यावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.तर माजी भाजप जिल्हा सरचिटणीस संजय बांबुळकर म्हणले की हे सक्षम, तगडे व विकासाभिमुख उमेदवार असून महायुतीने योग्य उमेदवार दिला आहे.त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही बांबुळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भाग प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, हे पटवून सांगण्यासाठी उमेदवार थेट मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती विरुद्ध ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी अशी थेट लढत देवगड तालुक्यातील निवडणुकीत असल्याने ही निवडणूक रंगतदार बनली आहे. असे असले तरनिवडणुकीपूर्वीच तालुक्यातील जि. प. गटाच्या चार जागा, तर पं. स. गणाच्या सहा जागांवरील महायुतीतील भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील जि. प. च्या उर्वरित तीन गटांसाठी, तर पं. स. च्या आठ गणांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार जि. प. च्या तीन गटांमध्ये एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून पं. स. च्या आठ गणांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत.
यात शिरगाव जि. प. मतदारसंघात वगळता पुरळ व कुणकेश्वर जि. प. गटात दुहेरी लढत होणार आहे. उर्वरित पं. स. च्या आठ गणांमध्येही दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपने बिनविरोध जागांच्या विजयाने अर्धी लढाई जिंकली असून उर्वरित जागांवरही १०० टक्के यश मिळविण्यासाठी भाजप महायुतीने कंबर कसली आहे. यासाठी महायुतीने स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविलेली दिसत असून डोअर टू डोअर प्रचारासह अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सोशल मीडियावर महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडीत घेतली आहे.
महायुतीतील भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून तो राष्ट्रनिर्माण व लोककल्याणाची चळवळ आहे. ग्रामीण भागाचा विकास हा महायुती शासनाच्या माध्यमातूनच होऊ शकतो. ग्रामीण भाग प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करून उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करून त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना गावातच रोजगार यावर लक्ष केंद्रीत केला जाईल. शिक्षण व स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाईल. या सर्व प्रश्नांवर ठोस, वेळेत व परिणामकारक उपाययोजना करण्याची क्षमता फक्त भाजप पक्षाकडे आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तालुक्यातील मतदारांना देत आहेत.महायुतीचे भाजप पक्षाचे उमेदवार जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेले आहेत.गाव पातळीवरील समस्या जाणणारे आहेत. सामाजिक कार्याचा अनुभव असलेले आहेत. हे उमेदवार प्रामाणिक, सुशिक्षित, अभ्यासू व कार्यक्षम असून ते विकास, सेवा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर काम करणारे आहेत. तसेच हे उमेदवार पारदर्शक व जबाबदार प्रशासन चालवतील, भ्रष्टाचारमुक्त कारभार करतील. सर्वसमावेशक विकासाची मुहूर्तमेढ रोवतील, असे आश्वासन महायुतीच्या उमेदवारांकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे पंचायत समिती जिल्हा परिषद मतदारसंघात उबाठा शिवसेना पक्षाचे उमेदवार यांची देखील प्रचारात आघाडी असून त्यांनी जिल्हा परिषद कुणकेश्वर प्रभागातील मतदारसंघात वाडी वस्त्या गावांमध्ये डोअर टू डोअर भेट देऊन प्रचाराला वेग दिला आहे.याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून कार्यकर्ते दररोज विविध गावांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.येथील गावांमधील विकासकामे, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण यासंदर्भातील समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जात असून यावेळी त्यांच्या सोबत उबाठा कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.










